ग्रामपंचायत कुडवली बद्दल

ग्रामपंचायत कुडवली (Kudavali) ही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पंचायत समिती अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायत कार्यालय कुडवली, अतिरिक्त MIDC मुरबाड-शहापूर रोड येथे स्थित आहे. ग्रामीण व औद्योगिक परिसराच्या संगमावर वसलेले हे गाव प्रगतिशील आणि विकासाभिमुख आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या २१८९ असून त्यापैकी १२८५ पुरुष९०४ महिला आहेत. गावाची साक्षरता दर ८१.०३% असून एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ४००.२१ हेक्टर आहे. भात शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे.

🏛️ प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत कुडवली ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असून ग्रामपंचायतीचे प्रशासन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समन्वयाने चालविले जाते. ग्रामविकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व सामाजिक उपक्रमांसाठी ग्रामपंचायत सातत्याने कार्यरत आहे.

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत कार्यालय कुडवली
अतिरिक्त MIDC, मुरबाड – शहापूर रोड
ता. मुरबाड, जि. ठाणे

📧 ई-मेल: Murbadvpkudavali@gmail.com

 

 

पदाधिकारी व अधिकारी माहिती

सरपंच:
श्री. रामचंद्र मालु सासे
📞 मोबाईल: 9527305600

उपसरपंच:
सौ. पूजा विशाल सासे
📞 मोबाईल: 7875334600

ग्रामपंचायत अधिकारी:
श्री. राजेश देविदास साळवे
📞 मोबाईल: 8788909923

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत कुडवलीमध्ये एकूण ९ सदस्य कार्यरत आहेत. सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे —

१. प्रकाश नारायण सासे
२. प्रिती वामन शिद
३. रोशन मंगळ घुटे
४. भाग्यश्री विलास माळवे
५. दर्शना दत्तात्रेय हरड
६. जगन्नाथ बारकु सासे
७. कैलास दामोदर सासे
८. अरुणा वसंत सासे

ग्रामपंचायत आढावा

ग्रामपंचायत कुडवली हद्दीत खालील मूलभूत व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत —

• ग्रामपंचायत भवन
• शाळा व अंगणवाडी
• पाणीपुरवठा योजना
• इंटरनेट सुविधा
• सीसीटीव्ही व्यवस्था
• डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र)
• व्यायामशाळा
• तलाव / गाव तलाव
• माध्यमिक विद्यालय

शैक्षणिक संस्था (Schools)

ग्रामपंचायत हद्दीत पुढील शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत —

• जिल्हा परिषद शाळा कुडवली
मुख्याध्यापक: रविंद्र रघुनाथ घरत
संपर्क: 9049500558

• जिल्हा परिषद शाळा घुटेवाडी
मुख्याध्यापक: शिवाजी यशवंत पारधी

योजना व विकास उपक्रम

ग्रामपंचायत कुडवलीमध्ये पुढील शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात —

• प्रधानमंत्री आवास योजना
• जन मन योजना
• मोदी आवास योजना

ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹ ५५,००,०००/- असून त्याचा वापर पुढील बाबींवर केला जातो —

प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, ५% दिव्यांग कल्याण, १०% महिला व बालकल्याण, १५% मागासवर्गीय कल्याण, रस्ते, गटारे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर विकासकामे.

धार्मिक व सांस्कृतिक जीवन

ग्रामपंचायत कुडवलीतील प्रमुख धार्मिक स्थळ म्हणजे हनुमान मंदिर, कुडवली. गावात शिवजयंती उत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश उत्सव, दिवाळी, होळी हे सण उत्साहात साजरे केले जातात.

नागरिक सेवा

ग्रामपंचायत कुडवलीमार्फत खालील सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात —

• जन्म प्रमाणपत्र
• मृत्यू प्रमाणपत्र
• विवाह प्रमाणपत्र दाखला
• दारिद्र्य रेषेचा दाखला (निःशुल्क)
• हयातीचा दाखला (निःशुल्क)
• ग्रामपंचायत येणे नसल्याचा दाखला
• नमुना नं. ८ उतारा (मालमत्ता कर आकारणी नोंदवही)
• जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र
• मनरेगा मजूर नोंदणी अर्ज
• घरकुल अर्ज
• नळजोडणी अर्ज
• ऑनलाइन तक्रार फॉर्म
• नागरिक फीडबॅक फॉर्म

कार्यालयीन वेळ:
सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15
(सोमवार ते शुक्रवार – शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी वगळता)

योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम

मुरबाड पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

मुरबाड पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

03

Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services

Health & Education

Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship

Women entrepreneurship and youth skill development

Together, we aim to make every village model of cleanliness, digital governance, and sustainable development

Murbad Panchayat Samiti